शिक्षणाच्या बाजारातील दुकाने - खाजगी शाळा

तुम्हाला माहित आहे का भारतात २५ करोड विद्यार्थी आणि १५ लाख पेक्षा जास्त शाळा आहेत आणि या शाळांमधील २५% शाळा या खाजगी आहेत आणि आच्छर्याची गोष्ट ही की या खाजगी शाळांमध्ये ४०% विद्यार्थी शिकतात 😯
या शाळा अश्या कोणत्या सुविधा देतात जे की आपले पालक आपल्या मुलाला भरमसाट पैसे ओतून यांचं शाळेत घालत असतील.

या शाळा आपल्या सरकारी शाळांपासून वेगळ्या कश्या आणि यांच्या फीस एवढ्या भरमसाट का 🤔
म्हणतात ना प्रत्येक महाग वस्तू चांगली नसते, खाजगी शाळांच्या बाबतीत काहीस असच आहे, या शाळा पालकांना फिसच्या नावाखाली वेगवेगळे चार्जेस लावून चक्क लुबडतात.

शाळांना विद्येच मंदिर म्हटलं जात पण आजकाल ह्याच शाळा विद्या सोडून पैश्याच्या मागे धावत आहेत.
अगोदर शाळांमध्ये फक्त शिक्षण मिळत होत आता तुम्ही बघितलं असेल की शिक्षणापूर्वी या शाळांमध्ये मिळतात.
💼बॅगा
📚पुस्तक
📝स्टेशनरी
🥾शूज
👝लंच बॉक्स
👔आणि कपडे ते सुधा वर्गासाठी वेगळे, 👚PT साठी वेगळे

हा सर्व खेळ आहे कमिशनचा या शाळा मोठ मोठ्या कपडे - स्टेशनरी विक्रेत्यांशी हात मिळवतात, आणि मार्केट मध्येच कमी किमतीत मिळणाऱ्या वस्तू जास्त पैसे घेऊन पालकांना विकतात, सोबतच विक्रेत्यांकडून कमिशन देखील घेतात ते वेगळं, हा पैसा जातो कुठे या शाळा चालविणाऱ्याच्या खिशात, हा सर्व काळा पैसा असतो कारण शाळांच्या रेकॉर्ड मध्ये हा दाखवलाही जात नाही.

हा झाला छोटं धंदा आता मोठा धंदा असतो डोनेशनचा तुम्हाला माहित असेल की सरकार कडून शाळांना अनुदान मिळतेच सोबतच ज्या मोठ्या कंपन्या या शाळांना डोनेशन देतात त्यांना टॅक्स मध्ये सूट मिळते, या शाळा अश्या मोठ्या कंपन्याशी हातमिळवणी करतात आणि मोठे डोनेशन. (फक्त कागदावर) म्हणजे जर ५० लाख डोनेशन आल की कंपनीला मागच्या दाराने २० लाख परत देखील जातात (टॅक्स सूट पूर्ण घेण्यासाठी) आणि उरलेले शाळा मालकांच्या खिशात.

आता जरा सरकारी शाळांकडे बघू, तुम्हाला माहिती असेलच की सरकार या शाळांकडे किती लक्ष देत, त्यामुळे आपल्या सरकारी शाळांची हालत खराब आहे, त्यामुळे चांगली शाळा असली तरीही सरकारी शाळा ह्या लेबल मुले कुणी तिकडे जायला बघत नाही, त्या शाळेतील शिक्षक देखील आपल्या मुलांना तिथे घालत नाहीत.

आता सर्व शिक्षा अभियान नुसार खाजगी शाळांना देखील काही सीट्स गरीब मुलांसाठी ठेवावे लागतात, ही खूप चांगली गोष्ट आहे पण यामध्ये सुद्धा स्कॅम चालू आहे या सीट्स रिक्त ठेवल्या जातात आणि नंतर भरमसाट पैसे घेऊन श्रीमंतांनाच विकल्या जातात.

यात अजून एक स्कॅम असा की जे शिक्षक या खाजगी शाळांमध्ये शिकवतात त्यांचे प्रायव्हेट क्लासेस तुम्हाला गल्ली - गल्लीत मिळतील, दिवसभर क्लास मध्ये मेहनत घेतलेले हे शिक्षक शाळेत काय शिकवत असतील याचा अंदाज तुम्हाला येईलच मग शाळेत शिक्षक व्यवस्थित शिकवत नाहीत म्हणून हीच मूल या क्लासेस कडे वळतात.

या खाजगी शाळांमध्ये दिखावा खूप असतो, आणि प्रत्येक २-३ महिन्यांनी नवीन कार्यक्रम आणि शाळांच्या सहली, इथे सुधा शाळा पालकांकडून भरमसाट पैसा उकळतात.

भारतात एक नियम आहे की प्रत्येक शाळा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन किंवा ट्रस्ट म्हणून रजिस्टर असली पाहिजे, याचा अर्थ असा की जो काही पैसा येतो तो शाळेतील खरचांसाठी वापरला गेला पाहिजे पण हे फक्त पेपरवरतीच!!

या शाळांना सरकार कडून, पाणी, वीज मोफत मिळते तरी पण आणि दरवर्षी शाळा काही त्यांची डागडुजी किंवा नवीन इमारत बांधताना दिसत नाहीत पण तरी सुद्धा डेव्हलमेंट फिस त्यांच्या प्रत्येक वर्षाच्या फी मध्ये असतेच, शिवाय वाढत्या फिस चे कारण विचारलं तर ते बोलतात की शिक्षकांचे पगार, पण खरोखरच या शिक्षकांचे पगार एवढे जास्त आहेत का ? आणि दरवर्षी एवढे वाढतात ?

या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत, आणि जर तुम्ही देखील अशी फी भरत असाल तर शाळांना प्रश्न वीचारण्या सारख्याही. त्यामुळे नक्कीच हा प्रश्न विचारा आणि खाजगी शाळांचं हे रूप सर्वांसमोर आणण्यासाठी ही पोस्ट नक्कीच शेअर करा.

धन्यवाद 🙏

Post a Comment

Previous Post Next Post

Popular Items