आपण बऱ्याच वेळा विचार करतो कि पैसे हे फक्त काही लोकांच्याच हाती का येत राहतात आणि गरीब- गरीबच का राहतात ?
नमस्कार मित्रांनो,
या पुस्तकाचे नाव आहे "पैश्याचे मानसशास्त्र"
म्हणजेच The Physiology Of Money Marathi आणि याचे लेखक आहेत मॉर्गन हाउजेल याचा मराठी अनुवाद केला आहे डॉ. जयंत कुलकर्णी
यांनी, हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी
या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.
चला जाणून घेऊया, या पुस्तकामध्ये असे आहे तरी काय हे याला इतर Money Making अणि Personal Finance पुस्तकांपासून वेगळे बनवते.
आपल्या आयुष्यात आर्थिक साक्षरतेची आणि पैश्याची भूमिका फार मोठी आहे पण बऱ्याच वेळा आपण याकडेच दुर्लक्ष्य करतो, तुम्हीच विचार करा कि मित्र परिवार किंवा तुमच्या जवळच्या व्यक्ती सोबत तुमचे या विषयावर शेवटचे बोलणे कधी झाले होते ?
कदाचित क्वचितच झाले असेल
आपला या विषययाकडील दुर्लक्ष्य आणि टाळाटाळ यामुळेच आर्थिक साक्षरतेची कमतरता आणि पैश्याबद्दल
बरेच चुकीचे समज आहेत जसे कि ' पैसे नशिबात असतील
तरच मिळतील, श्रीमंत लोकच पैसे कमाऊ शकतात
आणि सर्वात वाईट कि पैसे फक्त त्याच्याजवळच असतो जे चुकीचे काम करतात इतरांचे शोषण
करतात.
खरतर पैसा हि सार्वत्रिक मालमत्ता
आहे, तुम्ही देखील पैसे कमाऊ शकता
यशस्वी होऊ शकता फक्त गरज आहे ती मानसिकता बदलण्याची, जर आपण हे करू शकलो तर नक्कीच आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र आयुष्य
जगू शकतो, सुरुवातीला तुम्हाला तुमची
सध्याची आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करावे लागेल आणि कोणतेही आढेवेढे न घेता ती मान्य
करावी लागेल, मराठी मध्ये एक म्हण आहे कि
"आपण झोपलेल्या माणसाला जागे करू शकतो, पण झोपेचे सोंग घेतलेल्या व्यक्तीला नाही" तसेच जर तुम्हाला परिस्थिती माहिती असून तुम्ही
त्याकडे "सर्व काही ठीक आहे" म्हणून दुर्लक्ष्य करत असाल तर हे सर्वात घातक
ठरेल.
The Psychology Of Money Marathi या पुस्तकात एकूण १९ छोट्या गोष्टी / धड्यांच्या माध्यतातून पैश्यांच्या मानसशास्त्रावर लेखकाने भाष्य केले आहे.
आता याला पैश्याचा दिखावा
म्हणावा कि काय माहित नाही पण लवकरच या महाशयांचे दिवाळे निघाले.
या पुस्तकामध्ये दुसरी व्यक्ती म्हणजे रोनाल्ड रीड त्यांनी आपल्या आयुष्यातील जवळजवळ २५ वर्षे पेट्रोपॅम्पवर गाड्या धुतल्या त्यानंतर मोठमोठ्या इमारतीच्या काचा पुसण्याचे काम देखील रोनाल्ड ने केले आता या अतिसामान्य माणसाला या पुस्तकामध्ये जागा कशी मिळाली याचा विचार करताय ना ? मग ती यासाठी कि हि व्यक्ती जेव्हा आपल्या व्हायच्या ९२ व्य वर्षी स्वर्गवासी झाली तेव्हा त्यांची संपत्ती होती ८० लाख डॉलर्स त्यांनी आपल्या आयुष्यात कमावलेली रक्कम साठवत गेले गुंतवत गेले आणि पुढे ती आपल्या मुलांना आणि समाजाला देऊन जगात सर्वत्र प्रसिद्ध झाले.
पण इथेच त्यांचं जग बदललं,
२००८ मध्ये आर्थिक मंदीने सर्वांना हादरून टाकले
यात त्यांना यापासून वाचण्यासाठी आपले घराचा लिलाव करावा लागला, जेव्हा एवढं करूनही ते लोन फेडू शकले नाहीत आणि
खटला दाखल झाले तेव्हा या एकेकाळी श्रीमंत आणि चाळीशीत निवृत्त होण्याऱ्या व्यक्तीने
न्यायालयामध्ये
कबुल केले कि त्यांच्ये आर्थिक
गाणीत चुकले त्यांच्याजवळ आता काहीच नाही ते पूर्ण कंगाल झाले आहेत.
मित्रांनो लेखकाने त्याच्या The Psychology Of Money Marathi या पुस्तकात या उदाहरणांवरून हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे कि आर्थिक साक्षरता हि पैसे असल्याने येत नाही किंवा उत्तम शिक्षणातूनही येत नाही, याबद्दल जाणून घेऊन स्वतःला आर्थिक साक्षर बनवणे हि खरी गरज आहे.
रोनाल्ड आणि रिचर्ड्स खरतर
दोन टोक आहेत, त्यामुळे त्यांनी
काय चुका केल्या कश्या सावरल्या या त्यांच्या अनुभवाचा भाग आहे आपणदेखील आज या दोन
टोकांमध्ये कुठेतरी हेलखावे खात आहोत योग्य आर्थिक नियोजन, खर्चांवर नियंत्रण आणि योग्य मार्गदर्शन यानेच आपण आपल्या व्यवहारांमध्ये
बॅलन्स ठेऊ शकतो.
एखाद्या व्यक्तीचे आर्थिक
यश हे एक नियमबद्ध शास्त्र नाही आपण पैसे असताना आणि पैसे नसताना कसे वागता ह्यावर
देखील आर्थिक स्थिरता आणि अस्थिरता अवलंबून असते, पैसे असेल तर माज नसावा आणि पैसे नसेल तर तो कमावण्याची जिद्द
असावी. ज्ञान कमावता येते आणि ते तुमच्याजवळ आयुष्यभर राहते एकदा कि तुम्ही हे मानसशास्त्र
समजले कि नक्कीच तुम्ही भरपूर चुका टाळू शकता आणि नव्याने उभे राहू शकता.
The Psychology Of Money या पुस्तकाची व्हिडीओ समरी खाली देखत आहे नक्की बघा आणि हि पोस्ट आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करून त्यांनाही पैश्याच्या मानसशात्राबद्दल नक्की सांगा.
PLAY BELOW VIDEO